Epik Pahani 2022
15 मार्चपर्यंत करता येणार ई-पीक पाहणीमध्ये नोंदणी ! - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी
तसे तुम्हाला माहिती असेल - याआधी ई-पीक पाहणीमध्ये नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती
मात्र अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये नोंदणी केली नाही - त्यामुळे नाफेडमध्ये हरभरा पिकाची नोंदणी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना अडचण येत आहे -
ती म्हणजे ऑनलाईन पीकपेरा नोंदणीची - तसेच हा पीकपेरा ई-पीक पाहणीच्या माध्यमातून नोंदणी केली तरच निघणार आहे
त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना 15 मार्चपर्यंत ई-पीक पाहणीमध्ये नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे
ई-पीक पाहणीचा काय फायदा ?
ई-पीक पाहणी या अँपमुळे शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पिकाची नोंद ऑनलाईन करता येणार आहे - त्यामुळे याची नोंद थेट पिकपेऱ्यावर होणार आहेत ई-पीक पाहणीची अंमलबजावणी केली तर हरभऱ्यासाठी देण्यात आलेल्या हमीभावाचा शेतकऱ्यांना फायदा होणार...